योग दिन आयोजन
आज दिनांक 21 जून जागतिक योग दिन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हराळवाडी येथे योग दिन्नानिमित्त सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी विविध योगासने केली. शाळेतील शिक्षक श्री. निरगिडे सर यांनी योगाचे महत्व व माहिती मुलांना दिली.
जय हरी माऊली
सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या जिल्हा परिषद
प्राथमिक शाळा हराळवाडी येथे आषाढी वारीनिमित्त वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी सोहळा
आयोजीत करण्यात आला होता. या दिंडी मधे शाळेतील सर्व विद्यार्थी व बरेचसे पालक
उत्साहाने सहभागी झाले होते. या दिंडी सोहळ्यास प्रत्यक्ष विठ्ठल व रुक्मिणी
अवतरले होते. त्याचबरोबर संत तुकाराम महाराज, संत नामदेव,
संत
एकनाथ, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव,
संत
मुक्ताबाई, संत जनाबाई आदी संतांचा मेळाच जणू हराळवाडी
येथे भरला होता. या सर्व भूमिका शाळेतील विद्यार्थी बजावत होते. विठ्ठल रुक्मिणी
यांचे पूजन, सुंदर सजवलेली पालखी, ग्रंथदिंडी व
वृक्षदिंडी यासह मुख्याध्यापक श्री बाबुराव वसेकर गुरुजी यांच्या हस्ते पालखी पूजन
करण्यात आले व दिंडीला सुरूवात झाली.
गावाला प्रदक्षिणा, गावदेवतांचे
पूजन, वृक्षलागवड व संवर्धन यांच्या घोषणा तसेच शिक्षमनाचे व स्त्री
शिक्षणाचे महत्व पटवून देणारी घोषवाक्ये, आणि ज्ञानोबा तुकाराम चा गजर करत
दिंडीला सुरूवात झाली. उभे गोल रिंगण, बैठे गोल रिंगण, आनंद फुगडी,
वारकरी
फुगडी याचा आस्वाद अबालवृद्धांनी घेतला. तीन वर्षाच्या मुलींपासून ऐंशी वर्षाच्या
पण मनाने तरूण आजींसह सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या आनंद फुगडीचा आस्वाद
घेतला.
या दिंडीसाठी ग्रामस्थ मंडळ हराळवाडी, माता पालक संघ हराळवाडी, पालक
शिक्षक संघ हराळवाडी यांनी सहकार्य केले. नियोजनामधे शाळा व्यवस्थापन समिती
हराळवाडी, भजनी मंडळ हराळवाडी, जय हनुमान मित्र मंडळ हराळवाडी यांनी
हातभार लावला.
आजच्या या दिंडी सोहळ्यास ग्रामस्थांनी भरभरून
प्रतिसाद दिला. श्री प्रकाश पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांना न्याहरीची सोय केली.
श्री गुरूनाथ मोटे यांनी सर्व बालवारकरी समुदायाला फलाहार दिला. तर गावातील श्री
बाळासाहेब धोडमिसे व त्यांचे चिरंजीव श्री जयराम धोडमिसे यांच्या वतीने दिंडीमधे
सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सकस व रुचकर भरपेट भोजनाचा लाभ दिला.
हा सोहळा पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक बाबुराव
वसेकर गुरुजी, शहाजी माने, पद्माक्षी
मल्लाडे, किरण बाबर, संतोष माळगोंडे, सचिन निरगिडे,
सचिन
शिंदे व संजय ननवरे यांनी परिश्रम घेतले.
सरीवर सरी
आषाढ महिन्यात पावसाची चाहूल लागल्याने खास पावसाच्या कविता वाचनाची सदाबहार मैफल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हराळवाडी येथे काल शनिवारी सकाळी पार पडली. यावेळी सर्वप्रथम निसर्गाचे पूजन करण्याच्या उद्देशाने शालेय परिसरात असलेल्या दोन मोठ्या चिंचेच्या झाडांचे निसर्गाच्या प्रतिकात्मक पूजन शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री शहाजी माने सर व हराळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी पाऊस कवितांचे वाचन केले. इयत्ता पहिली ते आठवीच्या सुमारे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पावसाच्या विविध छटा दाखवणा-या विविध लहान मोठ्या कविता वाचून दाखवल्या. शाळेतील सर्व शिक्षक सुद्धा स्वतः या कार्यक्रमात सहभागी झाले व विविध रंग दखवणा-या पावसाच्या कवितांचे वाचन झाले. शहाजी माने, किरण बाबर, संतोष माळगोंडे, सचिन निरगिडे, सचिन शिंदे, संजय ननवरे यांनी कवितांचे वाचन केले. पद्माक्षी मल्लाडे यांनी खास पाठवलेल्या कवितेचे वाचन शहाजी माने यांनी केले. सचिन निरगिडे यांनी स्वतःच्या तो पाऊस... या कवितेचे वाचन केले.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अशा विविध
उपक्रमात भाग घ्यावा व स्वतःचा विकास करून घ्यावा. असे शहाजी माने सर
म्हणाले. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण
विकासासाठी, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल
माऊली हेगडे यांनी संयोजकाचे आभार मानले.
यावेळी अचानक उपस्थित झालेले शाळेतील जूने
शिक्षक चांगदेव पवार यांनी सुद्धा कविता सादर केली. पवार सरांचा निरोपात्मक सत्कार
श्री नाना शेळके व शहाजी माने यांच्या हस्ते करण्यात आला. पवार गुरूजींना निरोप
देताना त्यांचे विद्यार्थी व पवार सरांच्या डोळ्यातून सरीवर सरी बरसत होत्या.
कार्यक्रमाचे काव्यात्मक सूत्रसंचालन सचिन निरगिडे सर यांनी केले तर आभार संतोष
माळगोंडे सर यांनी मानले.












.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment