पावसाच्या कविता वाचनाची सदाबहार मैफल

 पावसाच्या कविता वाचनाची सदाबहार मैफल 

सरीवर सरी

 

आषाढ महिन्यात पावसाची चाहूल लागल्याने खास पावसाच्या कविता वाचनाची सदाबहार मैफल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हराळवाडी येथे काल शनिवारी सकाळी पार पडली. यावेळी सर्वप्रथम निसर्गाचे पूजन करण्याच्या उद्देशाने शालेय परिसरात असलेल्या दोन मोठ्या चिंचेच्या झाडांचे निसर्गाच्या प्रतिकात्मक पूजन शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री शहाजी माने सर व हराळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी पाऊस कवितांचे वाचन केले. इयत्ता पहिली ते आठवीच्या  सुमारे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पावसाच्या विविध छटा दाखवणा-या विविध लहान मोठ्या कविता वाचून दाखवल्या. शाळेतील सर्व शिक्षक सुद्धा स्वतः या कार्यक्रमात सहभागी झाले व विविध रंग दखवणा-या पावसाच्या कवितांचे वाचन झाले. शहाजी मानेकिरण बाबरसंतोष माळगोंडेसचिन निरगिडेसचिन शिंदेसंजय ननवरे यांनी कवितांचे वाचन केले. पद्माक्षी मल्लाडे यांनी खास पाठवलेल्या कवितेचे वाचन शहाजी माने यांनी केले. सचिन निरगिडे यांनी स्वतःच्या तो पाऊस... या कवितेचे वाचन केले.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अशा विविध उपक्रमात भाग घ्यावा व स्वतःचा विकास करून घ्यावा. असे शहाजी माने सर म्हणाले.  तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीत्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल माऊली हेगडे यांनी संयोजकाचे आभार मानले.

यावेळी अचानक उपस्थित झालेले शाळेतील जूने शिक्षक चांगदेव पवार यांनी सुद्धा कविता सादर केली. पवार सरांचा निरोपात्मक सत्कार श्री नाना शेळके व शहाजी माने यांच्या हस्ते करण्यात आला. पवार गुरूजींना निरोप देताना त्यांचे विद्यार्थी व पवार सरांच्या डोळ्यातून सरीवर सरी बरसत होत्या. कार्यक्रमाचे काव्यात्मक सूत्रसंचालन सचिन निरगिडे सर यांनी केले तर आभार संतोष माळगोंडे सर यांनी मानले.













No comments:

Post a Comment