आषाढी दिंडी

 आषाढी दिंडी 

जय हरी माऊली 

 

सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हराळवाडी येथे आषाढी वारीनिमित्त वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी सोहळा आयोजीत करण्यात आला होता. या दिंडी मधे शाळेतील सर्व विद्यार्थी व बरेचसे पालक उत्साहाने सहभागी झाले होते. या दिंडी सोहळ्यास प्रत्यक्ष विठ्ठल व रुक्मिणी अवतरले होते. त्याचबरोबर संत तुकाराम महाराजसंत नामदेवसंत एकनाथसंत निवृत्तीनाथसंत ज्ञानेश्वरसंत सोपानदेवसंत मुक्ताबाईसंत जनाबाई आदी संतांचा मेळाच जणू हराळवाडी येथे भरला होता. या सर्व भूमिका शाळेतील विद्यार्थी बजावत होते. विठ्ठल रुक्मिणी यांचे पूजनसुंदर सजवलेली पालखीग्रंथदिंडी व वृक्षदिंडी यासह मुख्याध्यापक श्री बाबुराव वसेकर गुरुजी यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले व दिंडीला सुरूवात झाली.

 

गावाला प्रदक्षिणागावदेवतांचे पूजनवृक्षलागवड व संवर्धन यांच्या घोषणा तसेच शिक्षमनाचे व स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून देणारी घोषवाक्येआणि ज्ञानोबा तुकाराम चा गजर करत दिंडीला सुरूवात झाली. उभे गोल रिंगणबैठे गोल रिंगणआनंद फुगडीवारकरी फुगडी याचा आस्वाद अबालवृद्धांनी घेतला. तीन वर्षाच्या मुलींपासून ऐंशी वर्षाच्या पण मनाने तरूण आजींसह सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या आनंद फुगडीचा आस्वाद घेतला.

 

या दिंडीसाठी ग्रामस्थ मंडळ हराळवाडी,  माता पालक संघ हराळवाडीपालक शिक्षक संघ हराळवाडी यांनी सहकार्य केले. नियोजनामधे शाळा व्यवस्थापन समिती हराळवाडीभजनी मंडळ हराळवाडीजय हनुमान मित्र मंडळ हराळवाडी यांनी हातभार लावला.

 

आजच्या या दिंडी सोहळ्यास ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. श्री प्रकाश पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांना न्याहरीची सोय केली. श्री गुरूनाथ मोटे यांनी सर्व बालवारकरी समुदायाला फलाहार दिला. तर गावातील श्री बाळासाहेब धोडमिसे व त्यांचे चिरंजीव श्री जयराम धोडमिसे यांच्या वतीने दिंडीमधे सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सकस व रुचकर भरपेट भोजनाचा लाभ दिला.

 

हा सोहळा पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक बाबुराव वसेकर गुरुजीशहाजी मानेपद्माक्षी मल्लाडेकिरण बाबरसंतोष माळगोंडेसचिन निरगिडेसचिन शिंदे व संजय ननवरे यांनी परिश्रम घेतले.











No comments:

Post a Comment